वेगवेगळ्या स्तरावर करावयाच्या उपाययोजनाची दिली माहिती .
रामटेक– उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असून रुगणांची पुरेपुर काळजी घेतली जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना रामटेक तालुका व शहरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
सोशल डिसनसिंग पालन करुनं हाथ सतत धुने फार गरजेचे आहे। जो ह्या नियमाचे पालन करेल तोच तारेल अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्दकिय अधिक्षक डॉ . प्रकाश उझगिरे यांनी दिली. दरम्यान पंचायत समिती सदस्य नरेन्द्र बन्धाटे यानि रुग्नालयास भेट देउन विचारना केली .येथे डॉक्टर,नर्सेस, कंपौंडर, कर्मचारी वर्ग सतत कार्यरत आहेत रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यन्त ७०० जनांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात कुणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही.
प्राथमिक रिपोर्टमधे ते सर्व जण निगेटिव्ह आढळून आले . केवळ सुरक्षितता म्हणून त्या सर्वांना १४ दिवसासाठी होम क्वारांटाईन करण्यात आले. . त्या सर्व नागरिकांशी मोबाईलवर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रोज संपर्क साधतात..कोरोनाचा सामना करण्यासाठी व रुग्णावर उपाययोजना करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर ठीकानी देखिलआयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती वैदकिय अधिक्षक डॉ उझगीरे यांनी दिली.