Advertisement
पुणे – ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथील विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले.
यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील टिंगरे,
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,उपायुक्त संजयसिंह चव्हाण आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.