Published On : Sat, Jun 20th, 2020

कामठी खुली खदान भांडार कक्ष गेट व ट्रक मागे दबुन मजुराचा मुत्यु

Advertisement

वेकोलिने मृतकाच्या पत्नीस एक लाख देऊन १५ लाख मदतीची हमी.

कन्हान : – वेकोलि कामठी खुली कोळ सा खदान च्या भांडार कक्षात ऑईलचे ड्रम खाली करण्याकरिता आयसर ट्रक चालकास मागे घेण्याकरिता सांगत अस लेला कंत्राटी मजुर महेश पात्रे ऑईल भांडार कक्षाच्या चॅनल गेट व ट्रकच्या मागच्या भागात दबुन गंभीर जख्मी होऊन उपचारा दरम्यान महेश पात्रेचा मुत्यु झाला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शनिवार (दि.२०) ला सकाळी ८ वाजता दरम्यान वेकोलि कामठी कॉलरी कोळसा खुली खदानच्या भांडार कक्षात ऑयसर ट्रक क्र.एम एच ४९ ए टी१५८६ मध्ये सिलेवाडा येथुन आणलेले सामान कंत्राटदार विनोद सिंह चे दोन कंत्राटी मजुरांनी खाली करून ट्रक मधिल ऑई ल ड्रम खाली करण्याकरिता ट्रक ऑईल भांडार कक्षाच्या दरवाज्या सामोर ट्रक लावताना एक कंत्राटी मजुर ट्रक मध्येच उभा होता. दुसरा मजुर महेश भाऊदास पात्रे वय ४६ वर्ष रा.सत्रापुर कन्हान हा ट्रक चालकास ट्रक मागे घेण्यास सांगत असताना चिखलाने ट्रकचे चाक घसरत असुन चालकाने निष्काळजीने वेग वाढ वुन ट्रक मागे घेतला असता नियंत्रित न झाल्याने ऑईल भांडार कक्ष चॅनल गेट व ट्रकच्या मागच्या भागात महेश पात्रे दबुन गंभीर जख्मी झाल्याने जे एन दवा खान्यात दाखल केले.

प्रकृती गंभीर अस ल्याने कामठी येथील खाजगी सिटी दवा खान्यात भर्ती केले असता उपचारा दर म्यान दुपारी २ वाजता महेश पात्रे याचा मुत्यु झाला. भांडार कक्ष अधिकारी, सहा य्यक अधिकारी, संबधित अधिकारी घट नास्थळी वेळेवर हजर असते तर घटना टळु शकली असती. अशी नागरिकात चर्चा सुरू होती. कन्हान पोलीसांनी फि र्यादी भाऊ विजय पात्रे याच्या फिर्यादी वरून ट्रक चालक रामचरित्र विश्वकर्मा रा खदान न. ६ विरूध्द कलम २७९, ३३८, ३०४ (अ) भादंवि नुसार गुन्हा नोंद करू न थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गद र्शनात पुढील तपास सुरू आहे.

मृतक महेश पात्रे यांच्या नातेवाईक व नागरिकांनी मुतदेह पोलीस स्टेशन सा मोर ठेऊन संबधित दोषीवर ३०२ चा गु न्हा दाखल करून मृतकांची आई मसुंबी, पत्नी ज्योती, मुलगा रितीक याना नुकसा न भरपाई म्हणुन आर्थिक मदत करण्या ची मागणी केली.असता पोलीस स्टेशन ला आमदार आशिष जैस्वाल, नगराध्य क्षा करूणाताई आष्टणकर, नगरसेविका मेनिका गजभिये, नगरसेवक डॅनियल शेंडे, थानेदार अरूण त्रिपाठी या़ंच्यामध्य स्थित वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधक त्रिवेदी, कामठी खुली खदान अधिकारी सह उपप्रबंधक मनोज त्रिपाठी यांनी मृत काची पत्नी ज्योती पात्रे ला एक लाख रू नगदी देऊन २२ तारखेला एक लाख रू देण्याचे व अपघात वेकोलि नियमात बसल्यास १५ लाखाची मदत करण्याचे लेखी लिहुन दिल्याने मृतदेह अंतिम संस्कारा करिता हलविण्यात आला.

Advertisement
Advertisement