Advertisement
लॉकडाउनच्या काळात शांत असलेली नागपूरनगरी आता गुन्हेगारी घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खून, हत्या आणि गँगवारच्या घटनेनं नागपूर पुरते हादरून गेले आहे. रविवारी रात्री शहरातील लष्करीबाग परिसरातील गुंडांनी दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड केली आहे.
नागपुरातील लष्करीबाग परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केली.
गुंडांनी या परिसरात उच्छाद मांडला असून 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली आहे. रॉड आणि दगडाने गाड्यांची नासधुस केली आहे.
मध्यरात्री या गुंडांनी हैदोस घातला होता. रस्त्यात उभ्या असलेल्या प्रत्येक वाहनांची गुंडांनी तोडफोड केली
परिसरात 30 ते 35 गाड्या अशा रस्त्यावर पडलेल्या होत्या.
या प्रकरणाची पाचपावली पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींचा शोध घेत आहेत.