नागरिकांना करावा लागतो पाण्याच्या टंचाईचा सामना.
रामटेक– नगरपरिषदेचे उपाध्यक्ष यांचा राधाकृष्णन वार्ड व इतर बऱ्याचशा वार्डात पिण्याच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत.
रामटेक शहरालगत खिंडसी तलावाचा मोठा जलाशय असून सुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे .
वारंवार नागरिक पिण्याच्या पाण्याची तक्रार देतात आणि त्यांना सांगण्यात येते की, ” आज मोटर जडली, आज पंप जडला , विजेची कमतरता नसूनही पाण्याची टाकी भरली नाही.उलट सूलट उत्तर देऊन नगरपरिषद नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहे. चारपाच दिवसाआड नळ येते, आणि पाणी गढूळ सुद्धा येते .पावसाळ्यात पाणी जर गढूळ येत असेल तर नागरिकांना बरेचसे आजार सुद्धा होऊ शकतात.
काही महिन्याअगोदरच शहरात नवीन पाईप लाईन टाकली आहे , तरी सुद्धा नागरिकांना पिण्याचा पाण्याची टंचाई उद्भवत आहे , मग नवीन पाईप लाईन टाकण्याचा उपयोग कोणता? असा प्रश्न जागरूक नागरिक करीत आहेत. रामटेक शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात पाणीटंचाईची समस्या ही असतेच पण त्या सोडवण्यासाठी नगरपालिकेकडून ज्या उपाययोजना करण्यात येण्याची गरज आहे त्या मात्र होतांना दिसून येत नाही आणि त्यामुळे नागरिकांना नको तेवढा त्रास मात्र सहन करावा लागतो.अन्न, वस्त्र,निवारा यातील पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे आणि ती भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने पुरेपुर प्रयत्न करणे गरजेचे आहे पण सध्यातरी अनेक नागरिक पाण्यापासून वंचित आहेत.
लवकरात लवकर यावर योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कोषाध्यक्ष शेषराव बांते, कृष्णा पिंपरामुळे, गजानन बांते, व नागरिकांनी केली आहे.