Advertisement
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन समोर अजय यादव यांच्या लस्सी दुकानात भिक्षेकरूंच्या झुडपातील एका अनोळखी इसमाचा आज सकाळी 7 वाजता अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतकाच्या मुखातून फेस तसेच रक्त वाहत असल्याने मृत्यू संदर्भात विविध तर्क वितर्क लावण्यात येत होते.मृतकाची अजूनही ओळख पटली नव्हती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करोत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणी साठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे कामठी