Advertisement
कामठी :-कामठी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या घोरपड गावातील तलावाला जिल्हा परिषद ने कंत्राटी पद्धतीने एका मासेमार संस्थेला दिले असून या तलावात आज शेकडो च्या वर मासोळ्याचा संशयस्पद मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10 वाजता उघडकीस आले.
मासोळ्या मृत्यू पावल्याने मासोळ्या आपोआपच तलावाबाहेर पडले.
घटनेची माहिती मिळताच बीडीओ सचिन सूर्यवंशी व इतर अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळच्या तलावाला भेट देऊन गावातील काही मासेमार लोकांच्या मदतीने मृतक मासोळ्या ला पूर्णपणे बाहेर काढून मृत मासे व पाण्याचे नमुने पशुवैद्यकीय महाविद्यालयास पाठविले.या घटनेचे रहस्य अजूनही कायम आहे
संदीप कांबळे कामठी