Published On : Tue, Jul 7th, 2020

महादुला येथे भाजपाचे कटोरा आंदोलन सरकारसाठी मागितली नागरिकांना भीक

Advertisement

नागपूर: भाजपातर्फे आज महादुला येथील टी पॉईंटवर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विद्यमान महाविकास आघाडी सरकारविरुध्द कटोरा आंदोलन करण्यात आले. पैसे नसल्याचे सोंग करणार्‍या महाविकास आघाडीसाठी कार्यकर्त्यांनी कटोरा हाती घेऊन भीक मागितली.

या आंदोलनात न.प. महादुलाचे अध्यक्ष राजेश रंगारी, शहर अध्यक्ष प्रीतम लोहासारवा, गटनेता सारिका झोड, सभापती पंकज ढोणे, संगीता वरटी, नगरसेवक स्वप्नील थोटे, विजय राऊत संगीता ढेंगे, छाया मेश्राम, महिला आघाडी अध्यक्ष नंदा तुरक, छाया लांडे, महामंत्री विश्वनाथन चौहान, मनोज शेंडे, शक्तीकेंद्र प्रमुख नरेंद्र झोड, महिला आघाडी महामंत्री किरण कटरे, युवा उपाध्यक्ष आकाश राय, आकाश मेश्राम, मुन्ना मेश्राम, उपस्थित होते.
संरक्षण कंपाऊंडसाठी

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत बहादुरा येथील झुडुपी जंगल क्षेत्रात संरक्षण कंपाऊंड करण्याकरिता फेरफार लवकरात लवकर करण्यात यावा. तसेच झुडुपी जंगल क्षेत्रात कब्रस्थानाकरिता जागा मिळण्याबाबतच्या मागणीसाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले. सोबत या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement