Advertisement
सीबीएसई दहावीत ९५ टक्के गुणांसह प्रावीण्यप्राप्त
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी च्या परीक्षेत शहरातील देवयानी ढोबळे या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुणांसह प्रावीण्यप्राप्त केले आहे. तिच्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी देवयानीच्या घरी भेट देत तिचे अभिनंदन केले.
देवयानी ढोबळे शहरातील के.जॉन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाचा गौरव म्हणून ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी देवयानीच्या घरी तिची आई रजनी व वडील नरेंद्र ढोबळे यांच्या उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केले. शिवाय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.