रामटेक : जुलै महिना संपायला आला परंतु अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . कोरोंनाने आता बकासुर चे रुप धारण केले आहे. नगरधन,हिवरा बाजार, मनसर, बोरडा, बंजार ( पथरई)आणि आता रामटेक तालुक्यातील नगरधन येथे एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
सदर महिला ही डिलिव्हरी साठी डागा हॉस्पिटल नागपूर येथे भरती आहे. तिथे तिचा आहवल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा पती भाजीवाला आहे. तो 7, 14 आणि 21 जुलै ला नागपूर ला येथे भाजीपाला आणण्यासाठी गेला होता. कदाचित पतीच्या संपर्कात आला असेल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पतीची कोरोना टेस्ट यायची आहे आल्यावरच कळेल काय बाब आहे तर अशी माहिती तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चेतन नाईकवार यांनी सांगितली हाय रिस्क मध्ये कुटुंब मधील 7 लोक आहेत त्यांना नागपूर ला पाठविण्यात आले आहे.
आणि लो रिस्क मधे आलेल्या 13 लोकांना होम क्वारांटन केले आहे.बाकी शोध घेणे सुरू आहे.आणि लो रिस्क मधे असलेल्या लोकांचे सव्याब टेस्ट घेण्यात आले आहे. नगरधन येथील महिलेचा घराचा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सिल केला आहे.
अशी माहिती तालुका वैदकिय अधीक्षक डॉ चेतन नाईकवार यांनी दिली. तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश उजगरे, तालुका वैद्यकीय अधीक्षक चेतन नाईकवार हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
.