ऑटोवााल्याची पत्नी, मुलगी, आणि त्यांच्या घरातील एक महिला पॉझिटिव्ह.
रामटेक : जुलै महिना संपायला आला परंतु अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे .
नगरधन,हिवरा बाजार, मनसर, बोरडा, बंजार ( पथरई)आणि आता रामटेक शहरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.आरोग्य अधिकारी रोहित भोईर यांच्याशी विचारणा केली असता,” काही दिवसा अगोदर ऑटो चालकाचा अहवाल पॉझिटिव आला.
नंतर त्याचा संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधे असलेल्या 6 लोकांना नागपूर हॉस्पिटल ला पाठविले होते आणि लो रिस्क मधल्या काही लोकांना होम क्वारांटाईन केले होते. त्या पैकी ऑटो चालकची पत्नी आणि मुलगी, यांचा अहवाल पॉझिटीव आला तर ,ऑटो चालकाचा घरातील होम क्वारनटन असलेली एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.
रुग्ण संख्या वाढत असून रामटेक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे आता प्रभावी उपाययोजनांची गरज … असल्याचे मत नागरिक करीत आहे.मुख्याधिकारी स्वरूप खारगे हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.