Published On : Mon, Jul 27th, 2020

शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन खरीप कर्ज पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खरीप कर्जासाठी बँकेत न जाता ऑनलाईन अर्ज करता येतील. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात kcc.setuonline.com या वेबसाईटवर लॉगइन करुन शुभारंभ केला. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय बैस, जिल्हा सहनिबंधक कार्यालयातील अशोक कडू, प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुगुसकर यावेळी उपस्थित होते. ही माहिती nagpur.gov.in या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

खरीप कर्ज सुलभ रीतीने मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आता फक्त सेतू ऑनलाईन या संकेतस्थावर जाऊन एक क्लिक करुन जलदगतीने खरीप कर्जाची मागणी ऑनलाईन अर्जाद्वारे करता येईल. यासाठी अर्ज करण्याची पद्धत अशी आहे.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कर्ज मागणी अर्ज

* अर्ज भरण्यासाठी कर्जाचा प्रकार, कर्ज खात्याचा प्रकार, अर्जदारांची संख्या निवडून व मोबाईल क्रमांक टाईप करुन Submit बटनवर क्लिक करा

* आपल्याला टोकन क्रमांक भेटेल.
* अर्जदाराची वैयक्तिक माहिती नाव, जन्म तारीख, लिंग, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, निवासी तालुका, निवासी गाव, पिन कोड, बँकेचा बचत खात्याचा तपशील टाईप करा व यापूर्वी आपण वित्तीय संस्थेकडून कोणतेही कर्ज घेतले आहे का निवडून चालू कर्ज खात्यांची संख्या निवडा व NEXT बटनवर क्लिक करा.

* अर्जदाराचे चालू कर्ज असेल तर तिचा तपशील अर्जदाराची चालू कर्जाची माहिती येथे भरावी.

* “अर्जदारांची संख्या” येथे आपण एक पेक्षा जास्त अर्जदार निवडलेले असेल तर मुद्या क्रमांक 3 व 4 प्रमाणे त्यांची माहिती भरावी.

* जमिनीचा तपशील येथे “एकूण किती गटांमध्ये तुमची शेती आहे त्यांची संख्या निवडावी, तालुका, गाव, गट क्रमांक , गटामधील आपल्या शेतीचे क्षेत्रफळ (हेक्टर-आरमध्ये) टाईप करुन, सिंचनाचा स्त्रोत निवडून NEXT बटनवर क्लिक करा.

* आवश्यक कर्जाचा तपशील येथे कोणत्या बँकेकडून कर्ज आवश्यक आहे ते निवडा व आवश्यक कर्जाची रक्कम टाईप करा.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज- खरीप 2020
आपण भरलेली माहिती आपल्याला दिसेल माहिती बरोबर असेल तर Please Check to Confirm येथे टिक करुन Confirm बटनवर क्लिक करा. जर आपण भरलेली माहिती मध्ये काही बदल असेल तर EDIT बटनवर क्लिक करुन माहिती दुरुस्त करुन Submit करा.

Update Details अपूर्ण अर्ज पूण करा

1. फॉर्म भरतांना काही कारणाने आपण फॉर्म पूर्ण भरु शकलो नाही तर आपले टोकन क्रमांक / आधार क्रमांक टाईप करुन Submit बटनवर क्लिक करा.

2. आपला टोकन क्रमांक /आधार क्रमांक टाईप करुन Submit बटनवर क्लिक करा

3. आपण पूर्वी भरलेली माहिती दिसेल Edit वर क्लिक करुन माहिती पूर्ण करुन Submit करा.

Update Details ( Home/EpassStatus)

Download Application /अर्जाची प्रत

1. आपण भरलेले अर्जाची प्रत घेण्यासाठी टोकन क्रमांक /आधार क्रमांक टाईप करुन Submit बटनवर क्लिक करा

Download Application ( Home/EpassStatus)

Check Application /अर्जाची प्रत

1. आपण भरलेले अर्जाची सध्यास्थितीची माहितीसाठी टोकन क्रमांक/आधार क्रमांक टाईप करुन Submit बटनवर क्लिक करा.

Check Application Status (Home/ Status)

Advertisement