Advertisement
घरी राहूनच केली नमाज अदा
कामठी :-बकरी ईद ‘ईद -उल -अजहा’ही बलिदानाची ईद आहे .मुस्लिम मान्यतेनुसार हजरत इब्राहिम यांनी आपले पुत्र हजरत इस्माईल यांना याच बकरी ईद च्या दिवशी अल्लाहच्या आदेशानुसार अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते मात्र अल्लाहणे हजरत इस्माईल लास जीवनदान दिले त्याच त्याग आणि बलिदानाचा समूर्ती प्रित्यर्थ हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जातो या दिवशी कुर्बाणीला विशेष महत्व आहे या दिवशी कुर्बानी दिली जाते व गरिबांना अन्नदान दिले जाते.
मात्र यावर्षी कोरोनाच्या पाश्वरभूमीवर आज बकरी ईद निमित्त होणारी सामूहिक नमाज ही नेहमीप्रमाणे इदगाह मध्ये न होता घरीच नमाज अदा करण्यात आली
संदीप कांबळे कामठी