कामठी:- नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील पाणी टाकी समोर अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीच्या खून प्रकरणातील तीनही आरोपीना कामठी येथील विशेष फौजदारी न्यायालयाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली
नवीन कामठी पोलीस ठाण्याचे हद्दीतील रमानगर मार्गावरील पाणी टाकी समोर अनैतिक संबंधात नेहमीच अडसर होत असलेल्या पतीचा नेहमी साठी काटा काढण्याच्या दुष्टीकोणातून 30 वर्षीय पत्नीने दि 7 आगस्टला मध्यरात्री 3 वाजता सुमारास प्रियकर रुपेश दिलीप बिराह वय 35 व त्याचा चुलतभाऊ हरीचंद्र राजेंद्र बिराह वय 34 यांना घरी बोलावून तीनही आरोपीनी मृतक राजू कोकुर्डे चे दोरीने हात बांधून, नाक व तोंडावर उशीने दाबुन खून केला शेजारी राहणाऱ्या नागरिकाने 5 वर्षीय मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून खडकीतून डोकावून बघितले असता तीनही आरोपी राजू चा खून करताना दिसून नागरिकाने लगेच नवीन कामठी पोलीस ठाण्यात माहिती दिली असता हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव व मंगेश लांजेवार त्वरित घटनास्थळी पोहचून खुणातील तीनही आरोपीना रांगेहात अटक करून नवी कामठी पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला
तपास अधिकारी दुय्यम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नके यांनी तीनही आरोपींना कामठी येथील प्रथम श्रेणी फौजदारी न्यायाधीश डी आर भोला याचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 आगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली होती त्यामुळे आरोपी पत्नी व रुपेश यांचे प्रेमप्रकरण व अनैतिक सबंधाबद्दल माहिती, खुनाचा कट, व खुन करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आज तिन्ही आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने परत कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदनडाधीकारी डी आर भोला याचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली खुणातील तीनही आरोपीना अटकेची कामगिरी ठाणेदार राधेश्याम पाल, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नके, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, संदीप भोयर, सुरेन्द्र शेंडे यांनी केली
संदीप कांबळे कामठी