Published On : Fri, Aug 21st, 2020

नागपुरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी

Advertisement

नागपूर : पर्यावरण संवर्धनाचा विचार करता यावर्षी नागपूर शहरातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

नागपूर शहरातील सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव या तलावात मूर्ती विसर्जनाला मागील काही वर्षांपासून प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Gold Rate
Thursday 16 Jan. 2025
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 92,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फक्त फुटाळा तलावात सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. परंतु यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती चार फुटाच्या असल्याने कृत्रिम तलावात या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Advertisement