Advertisement
नागपुर – युवासेना नागपूर शहर च्या वतीने, संघर्ष नगर ते कचरा डम्पिंग रोड वरील दररोज मोठ्या वाहतुकी मुळे, रस्त्यावरील खड्डे, पडल्याने पाय वाट चालणाऱ्या नागरिकांना व दुचाकी स्वारांना खूपच त्रास होत असून दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे अपघात होत असतात.
मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नाईलाजास्तव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. पूर्व नागपुर शिवसेना, युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात येत्या २७ ऑगस्ट रोजी, गुरुवार लासकाळी 11 वाजता संघर्ष नगरात कचरा डंपिंग रोडवर आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात सहभागी, योगेश न्यायखोर पूर्व नागपूर व वाथोडा प्रभाग प्रमुख २६ चे रुपेश बांगडे उपस्थित राहतील. असे आव्हान गौरव गुप्ता यांनी केले आहे.