नागपुर/मुम्बई– मुखमंत्री श्री उद्धव ठाकरे, यांना राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत यासाठी आम आदमी पार्टी कडून मा मुख्यमंत्री यांना दि ३ व २६ जून, १७ जुलै आणि ९ ऑगस्ट २०२० ला निवेदन दिले, क्रांती दिवसाला पालकमंत्र्यांच्या घराला घेराव केला, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेल भरो केले परंतु गार निद्रेत असलेले ठाकरे सरकार आजवर जागे झालेले नाही.
दोन दिवस घेण्यात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत जनहितार्थ निर्णय घेण्याची विनंती आम आदमी पार्टी कडून करण्यात आली होती, परंतु मिडिया प्रमाणे सरकार सुद्धा सुशांत, रिया आणि कंगना यांच्या विळख्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे कदचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल विचार करण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नाही असे दिसून येते.
संपूर्ण देशात आपल्या राज्यातजास्त भावाने वीज वसुली बंद करून आता तरी राज्यातील जनतेची लुट बंद करावी, आणि निवडणुकीपूर्वी दिलेले ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३०% स्वस्त वीज द्यावी यासाठी आम आदमी पार्टी कडून उद्या राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून घेण्यात आल्याचे व्यक्तव्य राज्याचे संयोजक श्री रंगा राचुरे यांनी केले आहे.
याच आंदोलनाचा भाग म्हणून आम आदमी पार्टी नागपुर उद्या काटोल रोड स्थित वीज कार्यालयासमोर ठीक 4 वाजता विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े यांच्या नेतृत्वात टाळे ठोको आंदोलन करणार आहे.
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१. कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा आपण स्वतः करावी,
२. MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी,
३. आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे – ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे,
४. राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा,
५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,
६. कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून मागील वर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत.
याबाबत ची सूचना मा मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.३/९/२०२० ला दिलेली आहे.