नागपूर : कोव्हिडच्या या संकटाच्या काळात अहोरात्र सेवा देत असलेल्या आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरमधील वैद्यकीय चमूचा दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सत्कार केला. यावेळी मनपाचे स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, नगरसेवक प्रदीप पोहाणे उपस्थित होते.
मंगळवारी (ता.१६) आमदार मोहन मते व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी आमदार निवास येथील कोव्हिड केअर सेंटरचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी नोडल अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने यांच्या नेतृत्वात कोव्हिड केअर सेंटरमध्ये दिवसरात्र सेवाकार्य बजावणा-या वैद्यकीय चमूंचे यावेळी आमदार मोहन मते व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी कौतूक केले. सेवा देणा-या या सर्व कोव्हिड योद्ध्यांचा शाल आणि श्रीफळ देउन सत्कारही करण्यात आला.
आमदार निवासचे नोडल अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या भांडारकर, डॉ.मानसी उके, डॉ.आदिती रेवतकर, डॉ.रितीका खोलगडे, डॉ.किरण नाईक, वैद्यकीय कर्मचारी आशिष कोल्हे, गजेंद्र मेश्राम, परिचारिका प्रियंका ठाकरे, मनीष, रुपाली, भाग्यश्री, मेघा आदींचा शाल, श्रीफळ देउन आमदार मोहन मते व स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी गौरव केला.