सुनेगाव हायवे वर आंदोलन
बेला: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काल 28 सप्टेंबरला विदर्भ भर नागपूर कराराची होळी करण्याचे आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत वरिष्ठ नेत्यांचे आव्हानावरुन सोनेगाव (लोधी) येथील राष्ट्रीय महामार्गावर खरेदी-विक्री संघाचे नागपूर तालुका अध्यक्ष वसंतराव कांबळे यांचे नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आले.
विदर्भावर सतत अन्याय होत आहे. नागपूर करारानुसार 23 टक्के नोकर्या विदर्भ वाशी तरुणांना मिळायला हव्या होत्या. परंतु शासनाने आठ टक्के नोकऱ्या दिल्या विदर्भात वीज मोठे उत्पादन होते कोळसाही निघतो मुंबई चकाचक होते विदर्भ मात्र अंधारात राहतो. शेतकरी आत्महत्या, अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे नक्षलवाद वाढला तरुण सुशिक्षित बेरोजगार झाला. कोणत्याही सरकारचे विदर्भाकडे लक्ष नाहीत असे विचार यावेळी कांबळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय जय विदर्भ व वेगळा विदर्भ झालाच पाहिजे असे बुलंद पणे नारे लावले अंदाजे दोनशे कार्यकर्त्यांनी नागपूर कराराच्या प्रति ना आग लावून त्याची होळी केली
सोनेगाव येथील आंदोलनात नागपूर खादी ग्रामोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष बाबाराव कांबळे, माजी सरपंच सुरेश बहादुरे, भारत करोड बाजूने संदीपसंदीपuke धम्मपाल पाटील, प्रीतम पोहनकर, गौतम धनविजय ,नीलकंठ गोडघाटे ,सुनील कांबळे, रमेश तेलतुंबडे व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.