·माझे कुटुंब माझी जबाबदारी भिंती चित्राची पाहणी
भंडारा दि.30 : जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज नगरपरिषद भंडारा येथे भेट देवून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत नगरपालिकेनी केलेल्या वॉल पेंटिंग्जची पाहणी केली. या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांना भेटी देवून कामकाजाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत प्रशिक्षणाथी आय ए एस अधिकारी तथा नगरपालीका मुख्याधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने भंडारा शहरात मोठया प्रमाणात जनजार्गती करण्यात येत आहे. मास्क वापरा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा हा संदेश नागरिकांना देण्यासाठी नगरपालिका प्रशासकीय ईमारतीच्या भिंतीवर वॉल पेंटिंग करण्यात आली आहे.
या पेंटिंगची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली व नगरपालिकेची प्रशंसा केली. यावेळी नगरपालिकेच्या विविध विभागांना भेटी देवून कामकाजाची पाहणी केली.