Published On : Sat, Oct 3rd, 2020

OCW नेहमी घेते ज्येष्ठांची काळजी , सुरक्षित घरी रहा, घरच्या घरी पाणी बिल भरा

Advertisement

नागपूर, ३ ऑक्टोबर, २०२०: ज्येष्ठ नागरिकांना आता पाणीबिल भरण्यासाठी झोन कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रांपर्यंत जाण्याची गरज नाही. मनपा-OCWने पुन्हा एकदा डिजिटल पेमेंट सुविधांचे संस्मरण नागरिकांना करून दिले आहे. पाणी बिल आता www.ocwindia.com, नागपूर वॉटर अॅप व पेटीएम ई. मार्गांनी भरता येत आहे.

कोरोना महामारीच्या या काळात विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांना या डिजिटल सेवांच्या माध्यमातून केवळ पाणी बिल भरणेच नाही तर आपल्या पाणीविषयक समस्यांचे निराकरण करवून घेणे ही शक्य आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाण्याविषयी कुठलीही तक्रार असलेले ज्येष्ठ नागरिक मनपा-OCWच्या टोल फ्री क्रमांक 1800-266-9899 वर किंवा 7028903636 वर कधीही संपर्क करू शकतात.

www.ocwindia.com या संकेतस्थळावर देयक भरण्यासोबतच आता ‘नागपूर वॉटर’ या अॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकांना मनपाच्या विविध सेवा घरी बसल्या उपभोगता येतील. हे अॅप वापरण्यास अत्यंत सोपे व पारदर्शी असून आपल्या मोबाईलवरूनच देयक भरणे यामुळे शक्य होत आहे.

मोबाईल अप्लिकेशनबरोबरच मनपा-OCWने पेटीएमची सुविधाही नागरिकांसाठी आणलेली आहे. पेटीएम हे एक लोकप्रिय ई-वॉलेट असून मनपा-OCW आता याद्वारेही पाणी देयक स्वीकारत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना केवळ आपल्या पाणीदेयकावर नमूद CAN क्रमांक आणि देय रक्कम टाकावयाची हे. भरणा केलेल्या रकमेची पावती पेटीएमकडून प्राप्त होईल. जमा केलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यात २४ तासांत झळकेल. ज्येष्ठ नागरिकांना पेटीएमकडून अनेक सवलतीदेखील प्राप्त करता येतील.

डिजिटल तसेच कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मनपा-OCW यांनी सर्व झोन कार्यालयांमध्ये स्वाईप मशीन्स उपलब्ध करवून दिलेले आहेत. नागरिक व्हिसा किंवा मास्टर कार्ड या डेबिट अथवा क्रेडीट कार्डद्वारे देयक भरू शकतात. या सर्व व्यवहारांसाठी नागरिकांना कुठलेही अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

मनपा व OCW यांनी ज्येष्ठ नागरिकांना व इतर ही ग्राहकांना कॅशलेस व्यवहार अधिकाधिक करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोरोन काळात बाहेर पडण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यांना सुरक्षित राहण्यास मदत मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांनी घरातच सुरक्षित राहून आपले पाणी बिल भरावे तसेच पाणीविषयक समस्यांचे निराकरण करवून घ्यावे.

For more information about digital payment options consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899 or OCW CGRC @.

Advertisement