६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उंटखाना येथे प. पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे धम्म दीन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आंबेडकर मैदान येथे पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उंटखाना चौकातील डॉ.आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला नालंदाताई गणवीर, राजेंद्र साठे, संघपाल गाणार,संजय आंभोरे, सहदेव भगत, प्रभाताई रामटेके,अनुसया ढाकणे, सुजाता सुके, न्यायबिंदू ताकसांडे, एड. विजय फुलकर आदी उपस्थित होते.