मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत १२३१४ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवार (१५ ऑक्टोंबर) ला शहरातील बाजारपेठेत कोरोनाबाबत जनजागृती रॅली काढून नागरिकांना कोव्हीड – १९ पासून बचाव करण्यासाठी मास्कचा, सैनीटाईजर चा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे सांगितले.
शोध पथकाच्या जवानांनी फुले मार्केट, सीताबर्डी, गोकुलपेठ, रामनगर, महाल, गांधीबाग, इतवारी, छोटा ताजबाग, सक्करदरा, बुधवारी बाजार, कमाल चौक, इंदोरा चौक, जरीपटका मार्केट मध्ये जनजागृती रैली मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशावर काढण्यात आली.
या रैलीचा नेतृत्व मनपा उपायुक्त व संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार यांनी केला. त्यांनी सांगितले की, नवरात्रीपासून सणांची सुरुवात होत आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, वर्चेवर हात धुणे व मार्केट मध्ये सामाजिक अंतरचा पालन करावा, या पध्दतिने कोरोनावर नियंत्रण केल्या जाऊ शकते.
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (१५ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १६८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १२३१४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ४५,१६,०००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३५, धरमपेठ झोन अंतर्गत ४२, हनुमाननगर झोन अंतर्गत १५, धंतोली झोन अंतर्गत २, नेहरुनगर झोन अंतर्गत १५, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ६, लकडगंज झोन अंतर्गत ६, आशीनगर झोन अंतर्गत १८, मंगळवारी झोन अंतर्गत १७ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द गुरुवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ६८४४ बेजबाबदार नागरिकांकडून रु ३४ लक्ष २२ हजार वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.