Published On : Wed, Nov 11th, 2020

आचारसंहिता भंग करण्यासंदर्भात मनपाची कारवाई

Advertisement

संपूर्ण शहरातील १६८ बॅनर हटविले

नागपूर : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त नागपूर विभागात आचारसंहिता लागू आहे. या काळात कुठल्याप्रकारची नियमांच्या विपरीत वागणूक दिसून आल्यास कारवाई सुरू आहे. नागपूर शहरामध्येही महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रचार करणारे, संस्था तथा व्यक्तींचे बॅनर, होर्डिंग हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे शहरात कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घेतली जात असून बुधवारी (ता.११) शहरातील दहाही झोन अंतर्गत १६८ बॅनर तथा पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. पदवीधर निवडणुकीसंदर्भात प्रचार करणारे संस्थांचे, व्यक्तीचे बॅनर, होर्डिंग आणि छापील किंवा मुद्रित प्रवेशद्वार आदी कुठल्याही भागात लावण्यास मनपातर्फे परवानगी नाही. ते लावल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. त्याअंतर्गत मनपाची कारवाई सुरू असून सर्वाधिक बॅनर, होर्डिंग सतरंजीपुरा आणि आसीनगर झोनमधील हटविण्याची कारवाई झाली आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५ व्यक्ती किंवा संस्थेद्वारे लावण्यात आलेले पाचही बॅनर तथा होर्डिंग्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच धरमपेठ झोन अंतर्गत ५ व्यक्ती किंवा संस्थांद्वारे लावण्यात आलेले पाचही बॅनर तथा होर्डिंग्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. हनुमाननगर झोन अंतर्गत ११ व्यक्ती किंवा संस्थांद्वारे लावलेले ११ बॅनर तथा होर्डिग्स, धंतोली झोन अंतर्गत ५ व्यक्ती किंवा संस्थांद्वारे लावण्यात आलेले ५ बॅनर तथा होर्डिग्स, नेहरूनगर झोन अंतर्गत ६ व्यक्ती किंवा संस्थांचे १० बॅनर तथा होर्डिग्स तसेच महाल गांधीबाग झोन अंतर्गत १० व्यक्ती किंवा संस्थांकडून लावलेले दहा बॅनर तथा होर्डिग्स काढण्याची कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वाधिक ३९ व्यक्ती किंवा संस्थांद्वारे आचारसंहितेचा भंग करित ४२ बॅनर, होर्डिंग्स लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच सर्व बॅनर, होर्डिंग्स हटविण्यात आले. याशिवाय लकडगंज झोनमधील ६ व्यक्ती तथा संस्थांचे १२ बॅनर, होर्डिंग्स, आसीनगर झोन अंतर्गत १४ व्यक्ती किंवा संस्थांद्वारे लावलेले ४२ बॅनर्स, होर्डिंग आणि मंगळवारी झोनमधील ७ व्यक्ती तथा संस्थांचे २६ बॅनर, होर्डिंग आढळताच ते सर्व हटविण्यात आले आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये कडकरित्या झालेल्या या कारवाईमध्ये एकूण १६८ बॅनर तथा होर्डिंग्स काढण्याची कारवाई करण्यात आली.

पदवीधर मदतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये आचारसंहिता लागू असून कुणीही नियमभंग करू नये. कुठल्याही प्रकारची प्रचारात्मक साहित्य, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग बिना अनुमतिने प्रकाशित करू नये तथा त्याचे प्रदर्शन करू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement