Advertisement
नागपूर: दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण व मोठा सण. लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाचा सण. प्रकाशाने अंधारावर मात करण्याचा सण. या दिवाळीच्या नागपूरकर जनतेला, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मित्र व चाहत्यांना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. सण उत्साहात साजरा करा. सणांचा आनंद लुटा. मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेने पाळून सण साजरा करा.
स्वत:ला जपा. इतरांनाही जपा. पुन्हा एक नवे पर्व, नवीन आशा घेऊन नवे वर्ष येणार आहे. आपल्या जीवनातील अंधाराचे क्षण प्रकाशमय होतील.
सकारात्मकता आणि आत्मविश्वास कायम ठेवा, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.