Published On : Sat, Nov 21st, 2020

आई फाऊंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप

Advertisement

नगरसेवक नागेश सहारे यांचा पुढाकार

नागपूर : आई फाऊंडेशनच्या वतीने मनपाचे माजी क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या पुढाकारातून नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ३० मध्ये कार्यरत सुमारे १३० स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला मनपा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, भाजपचे दक्षिण नागपूर अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, नगरसेवक नागेश सहारे, रिता मुळे, सहायक आयुक्त हरिश राऊत, नेहरु नगर झोनचे झोनल आरोग्य अधिकारी विठोबा रामटेके उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती पिंटू झलके म्हणाले, आई फाऊंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक नागेश सहारे यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. समाजात कार्य करणाऱ्या उपेक्षित घटकांचा त्यांनी नेहमीच विचार केला आहे. दरवर्षी अशा उपेक्षित घटकांसाठी ते काही ना काही करीत असतात. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनातही त्यांचे योगदान मोठे आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळते, असे म्हणत त्यांनी आई फाऊंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

दक्षिण भाजपचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे म्हणाले, स्वच्छता कर्मचारी हे आपल्या शहराचे आरोग्यदूत आहेत. संपूर्ण शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचे कार्य ते करतात. अशा घटकांची दखल क्वचितच घेतली जाते. आई फाऊंडेशन आणि नागेश सहारे यांनी सामाजिक जाणीवेतून दिवाळीनिमित्त त्यांना केलेले भेटवस्तूंचे वाटप हे कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोजक नगरसेवक नागेश सहारे म्हणाले, समाजात कार्य करीत असताना आपल्याला समाजास काही देणे आहे, याचे भान नेहमीच ठेवतो. समाजाने आपल्या केलेल्या ऋणाची ही उतराई आहे. अशा उपक्रमामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. संपूर्ण स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जमादार सुधाकर भिमटे, सुरेंद्र बेले, राहुल लोणारे, दिलीप राऊत आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement