Advertisement
नागपूर: सुमारे पाव शतकापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 1994 रोजी चेंगराचेंगरीच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्या गोवारी समाजातील बंधू भगिनींना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.
गोवारी समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोठे बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि त्या समाजाच्या प्रगतीसाठी मी सदैव सहकार्य करेन, अशी ग्वाही ना. गडकरी यांनी दिली आहे.