Advertisement
नागपूर: कोरोना मुळे उदभवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्प पूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे