नसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांची साखळी उपोषणाला भेट
खापरखेडा: मागील दहा दिवसापासून पुनर्वसन मागणी साठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे मात्र अजूनही सत्ताधारी नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामूळे त्वरित पुनर्वसन मागणीचा प्रश्न निकाली काढा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचे मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी सांगितले ते बिनासंगम येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी शुक्रवारला आले असतांना बोलत होते.
वेकोलीने भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहित केल्यामूळे बिनासंमग व भानेगाव परिसरातील शेकडो शेतकरी बांधव भूमिहीन झाले आहे वेकोली लाखो टन कोळश्याचे उत्पादन घेत आहे वेकोली नफ्यात आहे मात्र तोटा प्रकल्पग्रस्त बिनासंगम व भानेगाव वासीयांच्या वाट्याला आला आहे
भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीत दररोज होत असलेल्या ब्लास्ट मूळे अनेक घरांना भेगा पडल्या आहे अनेक घरे क्षतीग्रस्त झाली आहेत येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगताहेत मात्र पालक म्हणून शासनाला कोणतीही चिंता नाही मागील सरकारच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसन साठी वेकोलीने ८५ कोटी तर महानिर्मिती कंपनीने १२२ कोटी रुपये केले मात्र पुनर्वसन प्रक्रिया कुठे रखडली याचा शोध घेणे महत्वाचे आहे त्यामूळे पुनर्वसन मंत्री विजय वडवट्टेवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार असून पुनर्वसन प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सांगितले
बिनासंगम व भानेगाव पुनर्वसन प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यामूळे यासंदर्भातील माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचे हेमंत गडकरी यांनी सांगितले गरज पडल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नसल्याचे सांगितले यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, विद्यार्थी सेना विदर्भ प्रभारी आदित्य दुरुगकर, महिला सेना शहर अध्यक्ष मनीषा पापडकर यांच्यासह महिला सेना पदाधिकारी अचला मेशन, स्वाती जैस्वाल, पूनम छाडगे, मंजूषा पाणबुडे, निखिल झाडे, चंदू ब्राम्हने आदि उपस्थित होते.