Published On : Thu, Feb 18th, 2021

दुस-या टप्प्याची मंजुरी, आमच्या कार्यकृतीचे फळ

– अधिक क्षमतेने काम करण्याचा संकल्प आहे”- सहाव्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात डॉ. दीक्षित यांचे प्रतिपादन

नागपूर :- नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्यपद्धतीमुळेच नागपूर मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्याच्या कामाचे फलित म्हणूनच दुसऱ्या टप्प्यासाठी परवानगी देण्यात आली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी प्रस्थापित झालेल्या संस्थेने केलेले अभूतपूर्व आणि असामान्य कार्य हा या यशाचा परिणाम आहे, महा मेट्रोच्या टीमने त्यांच्या कुटुंबाचे आणि प्रत्येक नागरिकाचे थेट आणि अप्रत्यक्षपणे मेट्रोला सहभाग लाभला त्या सगळ्यांचे अभिनंदन केले पाहिजे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रोच्या ६ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात हे मनोगत व्यक्त केले.

Gold Rate
Friday 21 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. दीक्षित यांनी आनंद व्यक्त केला की, या सहा वर्षात आम्ही अनेक मैलाचे दगड पार केले आणि अनेक यशाचे मानकरी ठरलो आम्हाला मिळालेले अनेक काम हा एकप्रकारे आमचा केला गेलेला गौरवच आहे. यामध्ये नवी मुंबईचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त नाशिक मेट्रोच्या कामाचाही समावेश आहे. ते म्हणाले की, आपण ज्या चिकाटीने, संयमाने आणि कर्तव्यातत्पर राहून काम केले आहे त्यापेक्षा अधिक क्षमतेने काम करण्याची गरज आहे.

आपल्यासमोर असलेले आव्हाने प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात साध्य होतील यात शंका नाही आणि महा मेट्रोच्या कामकाजाशी नागरिकांना जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना जागतिक स्तराच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, मेट्रो रेल्वेचे बांधकाम आणि कार्यपद्धती सोबतच आता आपण सेवा पुरवण्याची मानसिकता स्वीकारली पाहिजे, दर्जेदार काम करत राहिल्यास आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे आश्वासन डॉ. दीक्षित यांनी मेट्रो कुटुंबाला दिले.ते म्हणाले की, तिसऱ्या टप्प्याच्या कार्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे आणि हेच आपल्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. मंजुरीने पहिल्या टप्प्यातील कामात नवे चैतन्य निर्माण केले असून आगामी नववर्षाच्या पहिल्या तिमाहीत दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्याचा विश्वास त्यांनी दिला. ते म्हणाले की, सुरक्षित आणि विश्वसनीय वाहतूक सुविधा, अपघातमुक्त हालचाली आणि पर्यावरणाचे रक्षण करून देशसेवेच्या क्षेत्रात आम्ही नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करू..

स्वप्न झाले साकार – सचिन ढोमणे
मेट्रोचे ब्रँड अॅम्बेसेडर सचिन ढोमने म्हणाले की, परदेशाच्या १० वर्षांच्या भेटी दरम्यान माझ्या शहरात हे दृश्य केव्हा दिसेल असा विचार येऊन मन व्यथित होत होते. येथील नागरिकांना हवे तसे तंतोतंत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित ह्यांनी अल्पावधीतच साकार करून दाखवले. ते म्हणाले की, दररोज 2 लाख नागरिक माझी मेट्रोमध्ये प्रवास करतील, आता तो दिवस फार दूर नाही.

प्रगतीची रेषा मोठी केली – आनंद निर्वाण
विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्वाणयांनी सांगितले की, महामेट्रोचे प्रमुख डॉ. दीक्षित यांनी आपल्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाची रेषा आखली आहे. कार्यक्षम प्रशासन, नेतृत्व आणि टीमवर्क यांचे अनोखे उदाहरण मांडणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या दर्जेदार कामात कोणताही दोष नाही. येत्या काळात नव्या पिढीसाठी महामेट्रो हा उजळणीचा विषय असेल आणि शहराच्या उभारणीमुळे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रत्येक विकासाचे स्वप्न साकार होईल. महामेट्रोने सहा वर्षांच्या कालावधीत इतिहास रचला आहे.

मेट्रो मुळे शहरात उत्साह – निखिल वानखेडे
चर्चेच्या सत्रात निखिल वानखेडे ह्यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले आणि म्हणाले, “खापरीला जाण्यासाठी मेट्रो ट्रेन मिळाली नसती तर शारीरिक त्रासामुळे मला नोकारीतून बाहेर पडाव लागल असत.कोराडी ते मिहान हा दैनंदिन प्रवास होता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकतर बाइकचा हा लांब प्रवास थांबवायला हवा होता किंवा नोकरी सोडायला हवी होती. आईच्या सांगण्यावरून गेल्या काही दिवसापासून मेट्रोने प्रवास सुरु केला आणि माझा शारीरिक त्रास कमी झाल्याचे माझ्या लक्षात आले आहे.

मेट्रो ने प्रवास करा : श्री बोरकर
शिक्षक श्री जुगल किशोर बोरकर यांनी विद्यार्थ्यांकडून सुरक्षित प्रवास आणि प्रदूष मुक्त शहरे बनवण्यासाठी सहकार्या करा व मेट्रो आणि रेल्वे सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यवस्थापकीय संचालकांनी दीप प्रज्वलन केले. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक), सुनील माथूर, संचालक (वित्त), श्री. एस. शेवमॅथॉन उपस्थित होते. कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी आभार मानले.

जीवनरेषा निर्माण होत आहे: डबीर
मेट्रो रेल्वे ही शहराची जीवनरेषा बनत चालली आहे. नागरिकांची स्वप्ने पूर्ण करण्यात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या परिसंवादात सुधीर डबीर यांनी ही भावना व्यक्त केली.

उल्लेखनीय आहे कि प्रत्येक वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मेट्रो मित्र मेळावा, नागपूरकर जीवनशैली हे विषय होते. या वर्षी, प्रकल्प उभारणी आणि संचालन मध्ये सहकार्य करणाऱ्या चर्चेसाठी विविध क्षेत्रांमध्ये नामवंत गणांना आमंत्रित करून परिसंवाद आयोजित करण्यात आले. महिला सुरक्षा, महा कार्ड, फिदर सर्व्हिस या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. स्पीकर जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी श्री सचिन ढोमणे, श्री आनंद निर्वाण, श्री जुगल किशोर बोरकर, निखिल वानखेडे आणि श्री सुधीर डबीर शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

Advertisement