Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री उद्या रविवारी बंद राहील. पुढील आदेशापर्यंत दर शनिवार, रविवार दारूची दुकाने बंद राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिले आहेत.
नागपूर शहरात शनिवार व रविवार कोरोना संसर्ग काळामध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. उद्या रविवारी दारूची दुकाने देखील बंद राहतील.
यापुढे ज्यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे बंदचे आवाहन करण्यात येईल त्यावेळी दर शनिवार -रविवार दारू विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दारू विक्रेत्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.