40 शाळांमध्ये 393 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश यावर्षी दिल्ली पब्लिक स्कुल ला वगळले
कामठी -बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने कामठी तालुक्यातील 40 शाळा मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया आज 3 मार्च पासून राबविली जात आहे . मागील वर्षी 41 शाळांची निवड करण्यात आली होती मात्र यावर्षी दिल्ली पब्लिक स्कुल ला यादीतून वगळल्याने फक्त 40 शाळा आर टी ई प्रवेशासाठी ग्राह्य धरले आहेत.
प्रवेशासाठी 3 मार्च पासून 21 मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज पालकांना करता येणार आहे.अशी माहिती कामठी पंचायत समिती चे शिक्षण विस्तार अधिकारो कश्यप सावरकर यांनी दिली.
कामठी तालुक्यात शैक्षणिक सन 2021 -22या वर्षांमध्ये आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी 40 शाळांची निवड करण्यात आली आहे.खाजगी विना अनुदाणीत व स्वयंअर्थसहाययोत शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना शाळेच्या 25 टक्के विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.ऑनलाइन अर्जासाठी वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, लाईट बिल, पासपोर्ट, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुययम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नामा अर्ज, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र , दिव्यांग असल्यास दिव्यांग्याचे प्रमाणपत्र, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला , जन्माचा दाखला, घटस्फोटित असल्यास बालकांच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकात असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नचा दाखला देने बंधनकारक आहे.
संदीप कांबळे कामठी