Published On : Tue, Mar 2nd, 2021

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या अंगावर बुलोरो उलटली

Advertisement

– एक महिला ठार तर दोन गंभीर जखमी

खापरखेडा- स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत वेकोलीच्या अखत्यारीत असलेल्या बिनासंगम परिसरात पोलीसांच्या आशिर्वादाने मोठया प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे मात्र अवैध वाळू उत्खनन मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांसाठी कर्दनकाळ ठरले अवैध वाळूने भरलेली बुलोरो महिलांच्या अंगावर उलटल्याने एका महिलेचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यामूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृतक महिलेचे नाव गोदावरी नामदेव भुरे वय ४१ असे असून करुणा नामदेव जांगडे वय ४५ व ललिता ज्ञानेश्वर जांगडे वय ५० रा असे गंभीर जखमीचे नाव असून फिर्यादीसह तिघीही बिनासंगम गावातील रहिवासी आहेत.

प्राप्त माहिती नुसार फिर्यादी अश्विनी कैलास बहलपाडे मृतक गोदावरी भुरे, गंभीर जखमी करुणा जांगडे, ललिता जांगडे ह्या चारही महिला २ मार्च मंगळवारला पहाटे ५.३० च्या सुमारास बिनासंगम शिवारात मॉर्निग वॉकला गेल्या होत्या बिनासंगम शिवारातील ओम शांती पार्क समोर असलेल्या डांबरीकरण रस्त्याने पायदळ जात असतांना चौदा चाकाचा टिप्पर क्रमांक एमएच-४०-ऐके-७५६८ भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीकडे जात होता यादरम्यान अवैध वाळूने भरलेली महेंद्रा बुलोरो क्रमांक एमएच-३१-एफसी-४९९३ खापरखेडा कडे जात होती नॅशनल ब्रिक्स कंपनीच्या समोर दोन्ही वाहनचालकांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामूळे अवैध वाळूने भरलेली महेंद्रा बुलोरो मॉर्निग वॉक करण्याऱ्या गोदावरी भुरे, करुणा जांगडे, ललिता जांगडे व अश्विनी बेहलपाडे यांच्या अंगावर जाऊन उलटले सदर अपघाताची बातमी बिनासंगम गावात वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांनी गंभीर जखमी गोदावरी भुरे, करुणा जांगडे, ललिता जांगडे यांना उपचारा करीता कामठीच्या खाजगी रुग्णालयात नेत असतांना वाटेतच गोदावरी भुरे यांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत घटनस्थळावरून बुलोरो चालक राजू भुररे पळून गेल्याची माहिती मिळाली आहे याप्रकरणी किरकोळ जखमी फिर्यादी अश्विनी बेहलपाडे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असून टिप्पर चालक रोहित सुरेश झेराडे वय २४ रा छिंदवाडा याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

बिनासंगम परिसरात अवैध वाळूचा बाजार
स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बिनासंगम परिसरात वेकोलीच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर मागील अनेक महिन्यापासून पोलीसांच्या आशिर्वादाने अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे दररोज पहाटे चार पासून तर सकाळी ११ वाजे पर्यंत बिनधास्त अवैध वाळू उत्खनन सुरू असते अलीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मोठया वाहनांवर कार्यवाहीच्या घटना वाढल्यामुळे अनेक वाळू माफियांनी वेगळी शक्कल लढवत अवैध वाळू उत्खननासाठी महेंद्रा बुलोरो चारचाकी वाहन खरेदी केले आहे जवळपास ५० बुलोरो एकाच वेळी अवैध वाळू उत्खनन करीत असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली असून प्रत्येक बुलोरो मागे वेकोलीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना हजार रुपये देन देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement