नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत आसीनगर झोने मधील नारा जलकुंभ ४ मार्च (गुरुवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.
सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: नारा वस्ती, ओम नगर, आर्य नगर, निर्मल कॉलोनी, वेद नगर, अलंकार कॉलोनी, शंभू नगर, ओम साई नगर, प्रेम नगर, क्रीश्नाधाम सोसायटी, आराधना कॉलोनी, तिरुपती नगर, तावाक्कल सोसायटी, नुरी कॉलोनी, प्रीती हौसिंग सोसायटी, कोहिनूर सोसायटी, आदर्श कॉलोनी
शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.