गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना लसीकरनाचा लाभ
कामठी :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना नियंत्रणासाठी तालुका प्रशासन सुसज्ज असून सेवा देण्यास कटिबद्ध आहे तसेच सध्या कोरोना नियंत्रणाकरिता लसीकरण सुरू असून पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्करला लसीकरण देण्यात आले असून नुकतेच 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षे वयोगटातील दुर्धर आजारी नागरिकांना आरोग्य विभागाच्या वतीने मोफत लस लावण्यात येत आहे.या पाश्वरभूमीवर लस घेतल्यानंतर ही नागरिकांना नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे आव्हान आमदार टेकचंद सावरकर यांनी आज कामठी तालुक्यातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हनुमान सभागृह गुमथळा येथे आयोजित कोरोना लसीकरण कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी जी प च्या स्थायो समिती सदस्य प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.शासनाकडून लसीकरण करण्यात येत आहे.त्यामध्ये आरोग्य, पोलीस, महसूल, यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी फ्रंट वारीयर्स चा समावेश आहे.तर नुकतेच ज्येष्ठ नागरिकासह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस मिळावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सोय करणयात आली असून यासाठी नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी शासन निर्गमित करण्यात आलेल्या नोंदणीकृत वेबसाईट वर नोंदनी करायची आहे.
लसीचे दोन डोज देण्यात येत आहे,तत्पूर्वी कोविन एप वर नोंदणी आवश्यक आहे.कोविन एप वर नोंदनी केलेल्या नागरिकांना लसीकरणाचा संदेश मिळतो त्यानंतर त्यांनी लसीकरण घ्यायचे आहे.दुसऱ्या डोज साठी लसीचा डोज घेऊन 28 दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे.दुसरा डोज 28 दिवसांनी घ्यावा लागतो .लसीकरणाच्या 14दिवसानंतर अँटिबॉडीज विकसित होतात त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे अशी माहिती एसडीओ श्याम मदनूरकर यांनी दिली।.
संदीप कांबळे कामठी