कामठी :-आज.१३.३.२०२१ (प्रा.किरण पेठे, रयतेच वाली डीजीटल शैक्षणिक दैनिक, जिल्हा प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे (नागपूर विभाग) नागपूर जिल्हा आयोजित दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त “जाणता राजा”या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष (अ. भा. म. सा. प., पुणे) मा.श्री शरद गोरे ,उपाध्यक्ष मा.श्री. राजकुमार काळभोर, विदर्भ विभाग अध्यक्ष मा.श्री आनंदकुमार शेंडे , नागपूर विभाग अध्यक्ष मा .श्री. सतीश सोमकुवर, सरचिटणीस मा श्री जयेंद्र चव्हाण, नागपूर जिल्हा अध्यक्षा प्रा.किरण पेठे, उपाध्यक्ष श्री नामदेव राठोड होते.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ संगीता बाम्बोळे,अध्यक्षा , गोंडपिंपरी, जी. चंद्रपूर. होत्या.
स्पर्धेला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १६५ लोकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातून सर्वोत्कृष्ट -मध्ये तीन गणेश राऊत,स्मिता भिमनवार, राजेंद्र बनसोड यांच्या कविता, उत्कृष्ठ- मध्ये पाच,सुरेखा मैड, मधुकर दुफारे, अनिता गुजर, रझिया जमादार, रेखा येळम्बकर, प्रथम सात- रोहिणी पराडकर,शैलजा चव्हाण, सूनन्दा सोनार, प्रार्थना भोंगळे, प्रांजली मोहिकर, गणेश कुंभारे, मोहिद्दीन नदाफ, द्वितीय सात- प्रतिक्षा नांदेडकर ,रेवती साळुंके, राजश्री पोतदार, आशा चौधरी, सुनंदा अम्रुतकर, रजनी सलामे, शलाका पाठक तृतीय सात- प्रतिभा पिटके,रंजना मांगले, शैलजा कोरडे, सरोज गाजरे, परमानंद जेंगठे,उन्नती बनसोड, वैशाली लांडगे, उत्तेजनार्थ दहा-
सीमा भांदर्गे, मीरा शेबे,जगदीश्वर मुनघाटे, अविनाश ठाकूर, सुजाता अनारसे, उषा घोडेस्वार, रशिदा आतार, अश्विनी मिश्रीकोटकर, प्रतिमा काळे,दीपा वणकुद्रे, लक्षवेधी दहा-
सविता आवारे, अमोल चरडे, रघुनाथ राजापूरकर, वत्सला पवार, सुनिल मुळीक, सानिका पत्की, नरेश बांबोळे,वंदना राऊत, भा.रा. कडू, आप्पा तरे असा ४९ सारस्वतांना गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वीरीतीने पार पाडण्यात संगीता बाम्बोळे ,आणि स्नेहा मोरे (ग्राफिक्सकार) यांचे सहकार्य लाभले.