रामटेक– शनिवारी घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून, बहुधा महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल की राज्याच्या गृहमंत्री यांनी महिन्याला १00 कोटी वसुली वसुली करण्याबाबत आदेश दिले, असे पोलिस महासंचालकांनी आरोप केला.
ही घटना निंदनीय असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे ,नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर,नगरसेविका लता कामडे , अनिता टेटवार, अहिरकर, राजेश ठाकरे,उमेश पटले,राजेश जयस्वाल, राहुल किरपान,डॉ.विशाल कामदार ,चरणसिंग यादव,नंदू कोल्हे,नंदू पापडकर यांनी केली आहे.
या राज्यात हप्तावसुलीची जबाबदारी पोलिस अधिकार्यांना देत आहे. राज्यातील जनता अतीवृष्टी गारपिट, ओला दुष्काळ, कर्जमाफी, वीजबिल माफी यासाठी सरकारकडे आशेने पाहत असताना सरकारमधले अत्यंत महत्वाचे समजल्या जाणारे राज्याचे गृहमंत्री हे महिन्याला १00 कोटी हप्ता वसुली आणण्याबाबत पोलिस अधिकार्यांनाच आदेश देत आहेत.
हे अत्यंत निराशाजनक आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलनासह रस्त्यावर उतरू, असा इशारासुद्धा यावेळी आंदोलन कऱ्यानी दिला.