नागपूर: शहरातले कोरोना बाधित रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नागपुरातील रुग्णांसाठी आणखी दोन ऑक्सिजन टँकर शनिवारी दाखल झाले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून नागपूरला ऑक्सिजन टँकर प्राप्त झाले आहेत.
जयस्वाल निको ग्रुप रायपूर वरून आलेल्या दोन टँकरामध्ये २२ मे. टन आणि १६ मे. टन ऑक्सिजन आहे.
या ऑक्सिजनचा पुरवठा शासकीय, खाजगी व मनपाच्या रुग्णालयात केला जाईल. याचा लाभ किमान तीन हजार रुग्णांना होईल.
फडणवीस यांनी नागपूरसाठी पाच टँकरची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. यामधून दोन टँकर प्राप्त झाले आहेत.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेता श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. काल (ता. २३) रात्री विशाखापट्टनम येथून ऑक्सिजन एक्सप्रेस नागपूरला आली. त्यातील तीन ऑक्सिजन टँकर नागपूरला उतरविण्यात आले.