– कोविड केअर सेंटरमुळे कोराडीवासियांना दिलासा,कामठी उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त खाटा वाढवा,अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय सुविधा निर्माण करा,आशा हॉस्पीटलमधील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन
कामठी : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाविषयक आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उभारा, ग्रामीण भागातील एकही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहता कामा नये, रुग्णांना उपचारासाठी नागपूरवर अवलंबून न राहता त्यांना वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागातच प्राप्त व्हाव्यात, यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल येथे दिले.
महानिर्मिती कोराडी येथील कोविड केअर सेंटरला डॉ.राऊत यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महानिर्मिती आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडी येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शालिनीताई मेघे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश गजभिये, डॉ. संजय देशपांडे, मुख्य अभियंता राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजेंद्र राऊत, तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी अंशूजा गराटे आदी यावेळी उपस्थित होते.
कोविड केअर सेंटरमुळे कोराडी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असे सांगत डॉ. राऊत म्हणाले, या सेंटरमुळे सौम्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु करता येतील. कोराडी, महादुला या भागातील रुग्णांना या सेंटरमुळे आता याच परिसरात उपचार मिळणार आहे, ही बाब समाधानकारक आहे. येथील खाटांची संख्या 20 वरून 50 पर्यंत वाढवा तसेच येथे रुग्णांसाठी पोस्ट कोविड सुविधा उभारा, वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता रुग्णखोल्या वाढविणे गरजेचे आहे. यासाठी येथील बांधकामाचे त्वरित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवा, असेही ते यावेळी म्हणाले.
*विना लक्षण व सौम्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनाच विलगीकरण व उपचारासाठी येथे भरती करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत 20 खाटांची सुविधा असून यातील 10 खाटांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये पाच डॉक्टर्स, पाच परिचारिका तसेच तीन अटेंडंट कार्यरत असल्याची माहिती डॉ. गोडे यांनी यावेळी दिली.
डॉ. राऊत यांनी कामठी येथील उप जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील 42 घनमीटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कामठी येथील उप जिल्हा रुग्णालय येथे हलवून त्याची उभारणी करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजू घुगे यांना दिले. येथे कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त 100 खाटाची संख्या वाढविण्यात यावी. ग्रामीण भागात आरोग्य विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात यावी.* याबाबत पातुरकर यांनी विभागीय आयुक्त यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.उप जिल्हा रुग्णालयामध्ये एका छताखालीच क्ष-किरण केंद्र, पॅथालॉजी लॅब यासारख्या सर्व सुविधा निर्माण करा. कोरोना संसर्ग काळात तसेच पुढील काळातही रुग्णांना येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, कामठी उपजिल्हा रुगणाल्य येथे १०० वाढीव बेड,ऑक्सिजन प्लांट व इतर सर्व वैधकीय सामग्री लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या,कामठी उपजिल्हा रुगणाल्य येथे रुग्णवाहिका देण्या करीता मी मा.राऊत साहेब यांना विनंती केली त्यांनी विभागीय आयुक्त यांना कामठी उपजिल्हा रुगणालय येथे २ व स्वामी विवेकानंद हॉस्पिटल कोरडी येथे १ रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्याकरीता निर्देश दिले.यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिल्या. कामठी रोडवरील आशा रुग्णालयाच्या परिसरातील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या ऑक्सिजन प्लांटमुळे 100 जम्बो सिलिंडर्सर्ची पुर्तता होणार आहे. येथील ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळणार असंल्याचे ते यावेळी म्हणाले. येथील कोविड केअर सेंटरमध्ये 160 खाटा असून प्रत्येक खाटेला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. पीएसए या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी यावेळी दिली. कोराडी येथील विरांगणा राणी अंवतीबाई तालुका क्रीडा संकुल येथे लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. डॉ. राऊत यांनी या लसीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. कोरोना मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी करून लसीकरण होत असल्याचे बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेशजी भोयर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, कामठी नगर परीषद उपाध्यक्ष अहफाज अहमद, नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे,अनुराग भोयर, मंगेश देशमुख, अविनाश भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.