– अजिंक्यचा 25 वा “वृक्षारोपणाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस “
चंद्रपूर– जागतिक पर्यावरण दिनी जन्मलेल्या व जन्मापासून आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करणारे चंद्रपुरातील ट्री बॉय म्हणून मान्यता प्राप्त अजिंक्य कुशाब कायरकर आपला 25 वा वाढदिवस मानवतेच्या दूतांच्या हस्ते वृक्षारोपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.अजिंक्य आणि वृक्षाई ने सलग 25 वर्षाची परंपरा करोना च्या जीवघेण्या महामारीत ज्या योद्धानी आपल्या प्राणाची बाजी लावून करोना पॅसिटिव्ह मृतदेहावर अंतिम संस्कार केले ते चंद्रपुरातील योद्धे यांच्या उपस्थितीत कायम ठेवली.
ट्री बॉय अजिंक्य कायरकर चा जन्म 5 जून 1996 या जागतिक दिनी झाला.चंद्रपूर सारख्या जागतिक प्रदुषित शहरात जन्मलेल्या अजिंक्य चे पालक
कुशाब कायरकर यांनी अजिंक्य चा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा संकल्प केला.यासाठी वृक्षाई संस्थेच्या माध्यमातून त्यांनी झाडे आणि
त्यांचे संवर्धन करण्याचा विळा उचलला. गेली 24 वर्ष हा कार्यक्रम अव्यतपणे सुरू असून या कार्यक्रमाची दखल देशभरातील मान्यवर मंडळींनी
घेतली आहे.
मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अजिंक्य च्या कार्याची दखल घेत पत्ररूपी आशीर्वाद दिला. या आशीर्वादाने
त्याला बळ प्राप्त झाले आणि या कामी त्याने स्वतःला झोकून दिले. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे हस्ते अजिंक्यने वृक्षारोपण केले.योगगुरू रामदेव बाबा हे चंद्रपुरात आले असता त्यांनीही अजिंक्य च्या कार्याची दखल घेत वृक्षारोपण केले आणि त्याच्या कामाला प्रोत्साहन दिले.
अजिंक्य दरवर्षी शहरात वृक्षारोपण करून झाडे जगविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो.दरवर्षी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हेच अजिंक्य चे पाहुणे असतात,शहरात स्वच्छता करणारे स्वच्छता दूत यांचे हस्ते त्याने 2018 यावर्षी वृक्षारोपण करून वेगळा पायंडा पाडला.
या वर्षी सर्वत्र ऑक्सिजन ची कमतरता मोठया प्रमाणावर जाणवू लागली आहे त्यावर पर्यावरण संवर्धन हाच पर्याय आहे.हे लक्षात घेऊन यावर्षी आपला 25 वा “वृक्षारोपणाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस” करोना च्या पार्श्वभूमीवर आला आहे.मात्र कोणताही गाजावाजा न करता करोना च्या संकटात ज्या योद्धानी मानवतेची सेवा केली,त्या योध्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता.दिनांक 5 जून ला कृषी भवन येथे हा उपक्रम पार पडला. मानवतेचे दूतांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमात नगरसेवक पप्पू देशमुख यांनी वृक्षाईव चंद्रपूरकरांच्या वतीने रोख रक्कम व वृक्ष देत योध्याच्या सत्कार केला.अजिंक्य ने कडूनिंब व विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यासाठी या योध्याना सहकार्य केले जिल्हा कृषी अधीक्षक वराडे, प्रवीण हजारे सृजनचे आशिष देव ,वृक्षाई चे कुशाब कायरकर व बहीण भुमी कायरकर उपस्थित होते कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करून वृक्षारोपण केले.