Published On : Tue, Jun 8th, 2021

पावसामुळे खंडित वीज पुरवठा पूर्ववत

1

नागपूर– शहरात दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच त्यामुळे सुमारे साडे आठ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली असून बहुतांश ठिकाणचा वीज पुरवठा त्वरित सुरु करण्यात आला.तर काही ठिकाणी अद्यापही कामे सूरु आहेत.प्रभावित सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कामाला लागली होती.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीज वाहिनीवर झाड पडल्याने शहरातील त्रिमूर्ती नगर,टेलिकॉम नगर,गोपाळ नगर या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या भागातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी साधारण साडे तीनच्या सुमारास पूर्ववत सुरु करण्यात आला. तर जयप्रकाश नगर ,गायत्री नगर या भागात वीज वाहिनी वर झाड पडल्याने या भागातील वीज पुरवठा संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्रिमूर्ती नगर उप विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश नागदेवते,सहाय्यक अभियंता मकरंद फडणवीस,रत्नदीप बागडे,राहुल ललके आणि ऑपरेटर निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवनिर्माण सोसायटी व एकात्मता नगरातही वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. होता. महावितरणच्या जनमित्रांनी वीज वाहिनीवरील अडथळा दूर करून वीज पुरवठा सुरळीत केला. रवी नगर येथील शासकीय वसाहतीत वीज वाहिनीवर झाड पडल्याने सुमारे ३५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सिव्हिल लाईन्स उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते हे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत झाला.

बुटीबोरी भागातही पावसामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. सायगाव- डोंगरगाव रेल्वे लाईन जवळ वीज वाहिनीवर झाड पडल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून मंगळवारी दिवस उजाडताच वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला. अशी माहिती बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी दिली. नगरधन येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ११ कि.व्हो. वीज वाहिनीचे ११ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे चर्चेत, नगरधन, निखत,नांदापुरी, खंडाळा, नेरला, आजनी, मनापूर, भोजापूर या गावातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement