केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते लवकरच होणार लोकार्पण
नागपूर : केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत पूर्व नागपूर बाबुलबन पाणी टाकीचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच या टाकीचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने आज आमदार कृष्णा खोपडे यांनी स्थानिक नगरसेवक व म.न.पा.अधिका-यांसह पाणी टाकीचे निरीक्षण दौरा केला व कामाची पाहणी केली. पाणी टाकीचे काम लगभग पूर्ण झाले असून या टाकीमुळे परिसरातील पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. सध्या या ठिकाणी अन्य टाकीवरून पाणीपुरवठा होत असून वस्तीतील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचण होत होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत महानगर पालिकेच्या माध्यमातून वाढीव पाणी टाकीचे निर्माण या ठिकाणी करण्यात आले.
बाबुलबन पाणी टाकीची पाहणी करताना परिसरातील समस्यांचा देखील आढावा आमदार कृष्णा खोपडे यांनी घेतला. मैदानाची झालेली दुर्दशा, साचलेले पाणी व रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्याच्या बाबतीत आमदार कृष्णा खोपडे यांनी अधिका-यांवर नाराजी जाहीर केली व या समस्या कायमच्या दूर करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले.
यावेळी उपमहापौर मनिषा धावडे, नगरसेवक बाल्या बोरकर, कांता रारोकर, मनिषा अतकरे, संजय अवचट, महेंद्र राऊत, म.न.पा. अधिकारी मनोज गणवीर, दुपारे साहेब, बालू रारोकर, नामदेव ठाकरे, गोविंद धोसेवान, राजू दरोडे, अनिल कोडापे, अजय मरघडे, ओ.सी.डब्लू व अमृत योजनेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.