Published On : Sat, Jul 3rd, 2021

मेश्राम यांची राकिबप महासचिव पदी निवड

Advertisement

नागपूर : भूमी जनशक्ती परिवर्त किसान मजदूर संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम यांची राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांचे नेतृत्वात महासचिवपदी निवड करण्यात आली. संतोष मेश्राम यांनी शेतकऱ्यांकरिता हितांसाठी तसेच अन्याय , अत्याचार, भ्रष्टाचार, यांच्या विरोधात कित्येकदा आंदोलन केल्या गेले. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय दमदार युवा नेता म्हणून ओळखले जाते.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला. संतोष मेश्राम यांची कामगिरी बघून त्यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरेंनी आपल्या पार्टी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले. मेश्राम यांनी अनेक राज्यात किसानवर होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, यांचे विरोधात आंदोलन केले.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

व भ्रष्ट सरकारी अधिकारी यांच्यावरही लगाम कसून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांसाठी लढणारा युवा नेता संतोष मेश्राम यांची निवड महासचिव म्हणून राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीत करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची लहर सुरू होणार आहे. प्रत्येक गाव, तालुका, शहर व जिल्हास्तरावरील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी चे उमेदवार निवडणूक लढविणार असे त्यांनी म्हटले.

याप्रसंगी शामराव भगत स्वप्निल पातोडे, अमित इंगळे, रविचंद्र गव्हाळे, प्रमोद अहिरवार, तुकाराम सेलघरे, भाई शिरसाट आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Advertisement
Advertisement