Published On : Mon, Jul 5th, 2021

भाजयुमो नागपुरतर्फे MPSC परीक्षा संबधित विषयांवर राज्य सरकारने त्वरित लक्ष देण्याकरीता जिल्हाधिकार्यांना निवेदन..!

Advertisement

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मध्ये MPSC च्या परिक्षाला घेऊन जी अनिश्चितता व अस्थिरता आहे त्याला कंटाळून काल पुणे मध्ये एका 24 वर्षा च्या युवकाने आत्महत्या केली. नागपुरात सुद्धा बरेच अशे युवक आहेत जे याला घेऊन कंटाळले आहे.

दोन वर्षा पासून काहीच्या मुलाखाती घेण्यात आलेत नाही मुलाखाती घेतल्या तर त्यांना रोजू करण्यात आला नाही आणि मागील वर्षाची तर आता पर्यंत महाराष्ट्र सरकारने भूमिका सुद्धा नाही घेतली आहे की परीक्षा होईल की नाही होईल या बाबत महाराष्ट्र सरकारने त्वरीत पाउल उचलावे असे निवेदनात भाजयुमोने म्हंटले.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

MPSC चा जो आयोग आहे त्यांच्या मध्ये सुद्धा दोनच नियुक्त पदाधिकारी आहेत त्यामध्ये मध्ये सुद्धा उरलेले तीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावे ज्यांने करून MPSC च काम सुरळीत होईल.

भारतीय जनता युवा मोर्चानी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे अशी मागणी केली की स्वप्निल लोणकर ज्यांनी काल कंटाळून आत्महत्या केली. आपण स्वप्निलचा जिव तर वापस आणु शकत नाही पण त्यांच्या घरच्यांना २५ लाखांची आर्थिक मदत ही त्वरित करावी जेणे करुन त्याच्या घरच्यांना सहाय्यता होईल. त्यांना झालेल्या मानसिक दुःख तर भरुन निघू नाही शकत नाही. या कठीण प्रसंगात भाजयुमो खंबीरपणे लोणकर कुटुबींयासोबत ऊभे आहे.

निवेदनाद्वारे राज्यसरकारला ही चैतावनी देण्यात आली की MPSC चा विषय जर का तुम्ही लवकर मोकळा केला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक भूमिका घेईल व त्याच्या साठी युवा मोर्चा जबाबदार राहणार नाही अशी भावना यावेळी जिल्हाअधिकार्यांच्या मार्फेत राज्यसरकार विरोधात व्यक्त करण्यात आली.

शहर अध्यक्ष आमदार प्रविण दटके यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे व भाजपा नागपुर शहर महामंत्री व भाजयुमोचे पालक रामभाऊ आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात आज शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने यावेळी उपस्थित शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, सहसंयोजक गौरव हरडे, मंडल अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, अमर धरमारे, पंकज सोनकर, बादल राऊत, सन्नी राऊत, यश सातपुते, शैलेश नेताम, इजाज शेख उपस्थित होते.

Advertisement