केंदाच्या बळकटीकरणासाठी सलल्लगार समितीची गरज
नागपूर : रातुम नागपूर विद्यापीठात विविध शासकीय संस्थातर्फे अनुदान देऊन प्रशिक्षण देण्यासाठी सांगितले जाते. मात्र नागपूर हे पहिले विद्यापीठ आहे, जे असे प्रशिक्षण एकच केंद्रामार्फत देण्यापेक्षा वेगवेगळे विद्याशाखेच्या विभागातील प्राध्यापकांना कॉर्डिनेटर नेमून त्यांच्या मार्फत असे दिले जात आहे. परिणामी विद्याथ्र्यांचे नुकसान होत आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा केन्द्रच्या सुसूत्रीकरण आणि बळकटीकरणाकरिता विद्यापीठाकडून केन्द्रला सातत्याने मार्गदर्शन करणारी सुधारणा व सल्लागार समिती नेमण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.१९८३ भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून कोलते ग्रंथालयात प्री एक्झामिनेशन कोचिंग सेंटर (पीईसीसी) सुरू करण्यात आले.
२००७ नंतर यूजीसी एन्ट्री इन सव्र्हिस या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे, बँक, एसएससी प्रशिक्षण राबविण्यात येत आहेत. परंतु २०१६ ते २०२० दरम्यान विद्यापीठाला अनभिज्ञ ठेवून यूपीएससीचे प्रशिक्षण बंद करण्यात आले. पुढे याच कालावधीत विविध कोऑडिनेटर नेमून वॅâम्पसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बार्टी, तारतीचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले. अशाप्रकारे प्रशिक्षण राबविल्याने गोंधळात जास्त भर पडली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत विद्यापीठाचा नेमका निकाल काय यावरही प्रश्नचिन्ह सातत्याने उभे राहिले. पूर्णवेळ संचालक नसल्याने व केन्द्रला सातत्याने परीक्षेच्या प्रत्येक सल्ला देणारी व विद्यापीठाच्या मदतीने उपक्रम राबवणारी सुधारणा समिती इतर विद्यापीठाप्रमाणे नसल्याने विद्यापीठातील सर्वच प्रशिक्षण फिस्कटले. त्यामुळे आतातरी याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
या आहेत केदाच्या समस्या
सर्वच प्रशिक्षणासाठी एक पूर्ण वेळ संचालक नसणे, विविध को-ऑर्डीनेटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण देणे, वेंâद्राची स्वत:ची इमारत आणि अभ्यासिका नसणे, निवासी प्रशिक्षण न राबविणे, वसतिगृहाचा अभाव, एकाच विद्याथ्र्याला अनेकदा प्रशिक्षणास प्रवेश देणे, इतर विद्यापीठाप्रमाणे विद्यापीठ पंâडातून विद्यावेतन न देणे, सर्व आयोगाचे पूर्व परीक्षा निकाल लागल्यानंतर वेंâद्रातील विद्यार्थी व्यतिरिक्त इतर विद्याथ्र्यांकरिता मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे कार्यक्रम न राबविणे, २०१६ पासून यूपीएससीचे प्रशिक्षण बंद करणे, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पीईसीसीचे स्वतंत्रपणे विभाग न दाखविणे, प्रवेश प्रक्रियापासून ते निकाल लागेपर्यंत सर्वच प्रकियामध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करवून न देणे, या प्रामुख्याने समस्या आहेत.
स्पर्धा परीक्षा केदाचे नाव काय?
विद्यापीठात विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. मात्र या केंद्राचे नेमके नाव काय आहे, हे न समजणारे कोडे आहे. भारत सरकारच्या अनुदानाच्या वेळी प्री एक्झामिनेशन कोचिंंग सेंटर (पीईसीसी) होते. तर यूजीसीच्या प्रशिक्षणातून यूजीसी एंट्री इन सर्विस म्हणून ओळखले जाते. बारटी तारतीतर्पेâ अनुदान दिले जाते, तेव्हा अनूसूजित जाती , जमाती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण वेंâद्र होते. नेट-सेटच्या प्रशिक्षणाची हीच स्थिती आहे. जेव्हा पुणे सीएसई, जामिया, अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एक केंद्र, एकच संचालकाच्या नेतृत्वाखाली विविध प्रशिक्षण राबविले जात असल्याने त्यांच्या परीक्षांच्या निकालात भर पडली आहे.