Published On : Fri, Jul 16th, 2021
By Nagpur Today Nagpur News

ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कायदे करा : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

Advertisement

अजित पारसे यांचे गृहमंत्र्यांना पत्र ‘सायबर बुलिंग’ ने अनेक महिला त्रस्त.

 

नागपूर: सोशल मिडियावरही आता सायबरबुलिंग अर्थात ऑनलाईन छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर वावर असलेल्या महिलांचा वाढता मनस्ताप बघता ऑनलाईन छेडखानीविरुद्ध कठोर कायदे करा, असे पत्र सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविले.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभिनेत्री हेगांमी कवीने अंतर्वस्त्राबाबत आपली मते सोशल मिडियावर मांडली अन् सायबरबुलिंग, सोशल मिडियावरील छेडखानीचा मुद्दा ऐरणीवर आला. हेमांगी कवीने चपात्या करतानाच एक रिल सोशल मिडियावर अपलोड केले. यावर अनेक नकारात्मक कमेंट आल्या. या सायबरबुलिंग प्रकारात मोडतात. हेमांगीसारख्या अनेक मुली व महिलांंना रोज सोशल मिडियावर ऑनलाईन छेडखानीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटच्या जगात ऑनलाईन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करु शकते किंवा सामाजिक जिवनात त्यांना बदनाम करु शकते. याला आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून कायदे करण्याची मागणी केली.

सोशल माध्यमावर अश्लिल कमेंट्स किंवा चाटिंग करणे, कुणाची फेक आयडी तयार करुण बदनामी करणे, नको त्या बाबी टॅग करणे, ब्लॅकमेलिंग करणे. मुली किंवा महिलांसोबत घडणारे असे सर्व प्रकार ऑनलाईन छेडखानीत मोडतात. सोशल माध्यमात वावरताना याचा सर्वाधिक सामना महिला आणि मुलींना करावा लागतो. देशात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यंदा तो आकडा ४४ कोटींवर गेला असून महिलांची संख्याही मोठी आहे, असे पारसे यांनी नमुद केले आहे.

ऑनलाईन छेडखाणी रोखण्यासाठी प्रभावी कायदे नाहीत. त्यामुळे एखाद्या मुलीसोबत सायबरबुलिंगचा प्रकार घडला तर गुन्हेगाराला पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवता येतील, अशा कठोर कायद्याची काळानुरूप गरज आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

Advertisement
Advertisement