नागपूर : डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपावर उपाययोजना करण्यासाठी धरमपेठ झोन येथे आरोग्य सभापती संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला आरोग्य सभापती संजय महाजन यांच्यासह झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसरे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तुभ चॅटर्जी उपस्थित होते. डेंग्यूवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा, पाण्यात गप्पी मासे टाका, खुल्या भूखंडांची यादी तयार करून पुढील कार्यवाही करिता सहायक आयुक्त यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कशाप्रकारे उपाययोजना करायच्या याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांनी मार्गदर्शन केले.