Advertisement
नागपुर – शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मेडिकल चे अधिष्ठाता (डीन) डॉ. सुधीर गुप्ता यांना दि. ५ ऑगस्ट रोजी, शाॅल श्रीफळ व हिंदु ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे याची प्रतिमा देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्र. क्रमांक 30 मधे ज्येष्ठ नागरिकांना शाॅल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माथाडी कामगार सेनेचे शहर प्रमुख सिध्दुजी कोमजवार तसेच भारतीय कामगार संघटनेचे नागपुर शहर अध्यक्ष दिपक पोहनेकर, उपशहर अध्यक्ष विनोद शाहु, शिवसेना शाखा प्रमुख कार्तिक नारनवरे, भाविसेचे उपशहर प्रमुख शैलेन्द्र आंबीलकर , उपजिल्हा अध्यक्ष संजु पांडे, मोहित पांडे, सचिन शर्मा, दिनेश साखरकर, गजानन कोकुडे, राजुभाऊ लांबट, राकेश कोटटेवार, गौतम मेश्राम, राकेश चौधरी उपस्थित होते.