Advertisement
नागपूर: ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी ते झिरो माइल फ्रीडम पार्क आणि पुढे कस्तूरचंद पार्क पर्यंतची प्रवासी सेवा आज 20 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होईल. या विभागाचे उद्घाटन 12.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ऑरेंज लाईनच्या (सीताबर्डी ते खापरी) सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत व्यावसायिक सेवा चालू आहेत. एक्वा लाईनवरील सेवा (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) सकाळी 6.30 ते रात्री 8 पर्यंत चालू आहेत.
खापरीहून येणाऱ्या गाड्या आता सीताबर्डी ऐवजी कस्तूरचंद पार्क येथे संपतील. त्याचप्रमाणे, खापरीसाठी गाड्या सीताबर्डी ऐवजी नवीन स्थानकावरून सुटतील.