चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. 8 वी साठी परीक्षा दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेमधून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी दिनांक 18/ 08/2021 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेतील ३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, २ विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
पहिल्याच वर्षी 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा मनपा चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. जनरल प्रवर्गातून त्रिशा राकेश दुर्योधन, ओबीसी प्रवर्गातून हिमांशु अशोक ठाकरे याची निवड झाली.
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थाना केंद्र शासनाकडून प्रत्येकी 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या यशाबद्दल महापौर राखीताई संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे व इत्तर अधिकारी आणि शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.